महाराष्ट्रातील बहुतांश युवक आणि युवती या वेगवेगळ्या कॉलेजेस मध्ये शिक्षण घेत आहेत. आणि हीच खरी उद्याची महाराष्ट्राची किंवा भारताची पिढी आहे, महाराष्ट्राचे खरे भवितव्य आहे. महाराष्ट्राचे हे भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने महाविद्यालयातीन विध्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक,प्राध्यापक आणि हे फक्त अनुदानित किंवा विनाअनुदानित कॉलेजेस मध्येच नाही तर त्यासोबतच सर्व ट्युशन,कॉइचिंग क्लासेस किंवा इतर ठिकाणी प्रशिक्षण देणारे… खास करून आठवी-नववीच्या नंतरच्या विद्यार्थाना प्रशिक्षण देणारे सगळे शिक्षक ,प्राध्यापक हे उद्याच महाराष्ट्राचं देशाचं भवितव्य घडवत आहेत. या प्राध्यापक आणि शिक्षक मित्रांसाठी त्यांच्या रोजच्या धावपळीच्या जगामध्ये त्यांच्या जे नॉलेज आणि स्किल अपडेट करणे आवश्यक असते. ते नॉलेज आणि स्किल अपडेट करता येत नाही. कारण रोजचा कामात व्याप आणि इतर कौटुंबिक बाबी यामुळे आपले शिक्षण वाढविण्यासाठी,अध्ययन करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही ही वास्तविक परिस्थिती आहे .
अशा स्थितीमध्ये या महाराष्ट्राच्या उद्याच्या भविष्यासाठी, सर्व शिक्षक मित्रांसाठी एक अत्यंत उपयुक्त त्यांचं नॉलेज आणि स्किल वाढवणारा कार्यक्रम जेणेकरून सगळ्या विघार्थ्यांना महाराष्ट्रातल्या विघार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो आणि त्याचं नाव आहे ट्रेन द ट्रेनर प्रोग्राम ! Train the trainer Program
जर आपले काही प्रश्न असतील तर खालील ज्ञानज्योतीच्या समन्वयकांचे नंबर दिलेले आहेत. ते आपल्याला सगळी माहिती देतील.
मित्रांनो जेव्हा आपल्याला आयुष्यात काही मिळवायचं असतं… पैसा असू द्या, भौतिक प्रगती असू द्या किंवा दुसरी कुठलीही प्रगती असू द्या, त्यावेळेस आपण अधिक चांगलं लोकांना काय देऊ शकतो याचा पहिल्यांदा विचार करावा लागतो. मला असं वाटतं की हे प्रगतीचे गुपित आहे. आणि तुम्ही लोकांना जास्तीत जास्त काय चांगलं देऊ शकता त्यासाठी हा प्रोग्राम आखलेले आहे. तसेच हा निशुल्क आणि मोफत आहे. निश्चितपणे याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी कळकळीची विनंती करतो.
आपला
डॉ. विशाल भेदूरकर
Ex. वित्त व लेखा सेवा अधिकारी (महाराष्ट्र शासन)
संस्थापक संचालक ज्ञानज्योती एज्युकेशन